गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोबाचें ॥१॥ आणखी दुजें नेणों कांहीं । चाडचि नाहीं धनमानें ॥२॥ देवाविण वाटती ओस । वैकुंठ कैलास नावडती ॥३॥ निळा म्हणे आवडी जाणें । पुरवी खुणें जिवींचे तो ॥४॥