गणगोत अवघें धन – संत निळोबाराय अभंग – ७७६
गणगोत अवघें धन ।
आम्हां चरण विठोबाचें ॥१॥
आणखी दुजें नेणों कांहीं ।
चाडचि नाहीं धनमानें ॥२॥
देवाविण वाटती ओस ।
वैकुंठ कैलास नावडती ॥३॥
निळा म्हणे आवडी जाणें ।
पुरवी खुणें जिवींचे तो ॥४॥
गणगोत अवघें धन ।
आम्हां चरण विठोबाचें ॥१॥
आणखी दुजें नेणों कांहीं ।
चाडचि नाहीं धनमानें ॥२॥
देवाविण वाटती ओस ।
वैकुंठ कैलास नावडती ॥३॥
निळा म्हणे आवडी जाणें ।
पुरवी खुणें जिवींचे तो ॥४॥