कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥ सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥ आलिंगनें शीतळ काया । निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥ निळा म्हणे अवघींच अंगें । तुमच्या संगे सुस्नात ॥४॥