केलें तैसें वदलों देवें । अनुभवें उद्गार ॥१॥ नाहीं येथें चालों येत । तर्क मत पायांपें ॥२॥ स्वामीसवें निकटवासें । जैसें तैसें केंवि सरें ॥३॥ खोटी याची नव्हे चाली । निवडिली पारखितां ॥४॥ निळा म्हणे केला धंदा । परमानंदा आज्ञेचा ॥४॥