केलें तैसें वदलों देवें – संत निळोबाराय अभंग – ७७३
केलें तैसें वदलों देवें ।
अनुभवें उद्गार ॥१॥
नाहीं येथें चालों येत ।
तर्क मत पायांपें ॥२॥
स्वामीसवें निकटवासें ।
जैसें तैसें केंवि सरें ॥३॥
खोटी याची नव्हे चाली ।
निवडिली पारखितां ॥४॥
निळा म्हणे केला धंदा ।
परमानंदा आज्ञेचा ॥४॥