केला माझा अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७७२

केला माझा अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७७२

केला माझा अंगिकार ।
ठेविले कर जेणें कटीं ॥१॥
आतां सुखा नाहीं उणें ।
नामस्मरणें याचिया ॥२॥
तीर्थे व्रतें तपोवनें ।
वसती स्थानें भासती ॥३॥
निळा म्हणे साधनसिध्दि ।
दर्शनें उपाधी निरसिल्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

केला माझा अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७७२