कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ ॥१॥ नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥ इंद्रियांची पुरली धांव । बुध्दिभाव ठसावला ॥३॥ निळा म्हणे निरंतर । न पडे विसर चित्तासी ॥४॥