कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार ॥१॥ आतां दृष्टीपुढें दिसे । जेथें असें तें तैसें ॥२॥ सत्यासत्यमिळणी झाली । अवघी फावलीं निवडितां ॥३॥ निळा म्हणे उदयो केला । रवीचि उगवला नयनांत ॥४॥