कृपादीन प्रकाशिला – संत निळोबाराय अभंग – ७७०
कृपादीन प्रकाशिला ।
विलया नेला अंध:कार ॥१॥
आतां दृष्टीपुढें दिसे ।
जेथें असें तें तैसें ॥२॥
सत्यासत्यमिळणी झाली ।
अवघी फावलीं निवडितां ॥३॥
निळा म्हणे उदयो केला ।
रवीचि उगवला नयनांत ॥४॥
कृपादीन प्रकाशिला ।
विलया नेला अंध:कार ॥१॥
आतां दृष्टीपुढें दिसे ।
जेथें असें तें तैसें ॥२॥
सत्यासत्यमिळणी झाली ।
अवघी फावलीं निवडितां ॥३॥
निळा म्हणे उदयो केला ।
रवीचि उगवला नयनांत ॥४॥