कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥ म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥ न घेउनी कांही सेवा । धांविले कुणवा आपुलिया ॥३॥ निळा म्हणे सुखी केलें । हातीं धरिलें वरदानें ॥४॥