कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥१॥ परि मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥२॥ नव्हे कांही बहुश्रुत । वक्ता पंडित वाचाळ ॥३॥ निळा म्हणे श्रीविठ्ठल । बोलवी बोल ते बोलें ॥४॥