कांहीच जाणीव न करावी – संत निळोबाराय अभंग – ७६८
कांहीच जाणीव न करावी ।
आहे जिवीं हें ठावें ॥१॥
परि मज बोलवी देवो ।
तेथें उपावो कोणाचा ॥२॥
नव्हे कांही बहुश्रुत ।
वक्ता पंडित वाचाळ ॥३॥
निळा म्हणे श्रीविठ्ठल ।
बोलवी बोल ते बोलें ॥४॥
कांहीच जाणीव न करावी ।
आहे जिवीं हें ठावें ॥१॥
परि मज बोलवी देवो ।
तेथें उपावो कोणाचा ॥२॥
नव्हे कांही बहुश्रुत ।
वक्ता पंडित वाचाळ ॥३॥
निळा म्हणे श्रीविठ्ठल ।
बोलवी बोल ते बोलें ॥४॥