काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥ महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥ काय पिंजुनी केलें गगन । निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥ निळा म्हणे भरोनि अंबरा । निर्मिला वारा कासयाचा ॥४॥