काय विघरुनी केलें – संत निळोबाराय अभंग – ७६७
काय विघरुनी केलें पाणी ।
घडिली अवनी कासयाची ॥१॥
महिमा जाणें त्याचा तोचि ।
नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥
काय पिंजुनी केलें गगन ।
निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥
निळा म्हणे भरोनि अंबरा ।
निर्मिला वारा कासयाचा ॥४॥