काय काज कोणासवें – संत निळोबाराय अभंग – ७६६
काय काज कोणासवें ।
विठ्ठल देवें वांचूनी ॥१॥
काय नाहीं चरणापासीं ।
पाहिजे ज्याशी तें तेथें ॥२॥
म्हणोनियां जीवें साठी ।
करुनि नेहटी बैसलों ॥३॥
निळा म्हणे सभाग्य धणी ।
पुरवील आयणी सकळ ही ॥४॥
काय काज कोणासवें ।
विठ्ठल देवें वांचूनी ॥१॥
काय नाहीं चरणापासीं ।
पाहिजे ज्याशी तें तेथें ॥२॥
म्हणोनियां जीवें साठी ।
करुनि नेहटी बैसलों ॥३॥
निळा म्हणे सभाग्य धणी ।
पुरवील आयणी सकळ ही ॥४॥