काय करुं तैसे ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥१॥ राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥ काय करुं व्यत्पत्ती तैसी । जेणें वादासी मूळ होय ॥३॥ निळा म्हणे अहंकार वाढे । नलगे वेडें वैराग्य तें ॥४॥