ऐसा जोडियला दातार । करुनी नामाचा उच्चार ॥१॥ आम्हीं भाग्यवंतीं जनीं । पायीं याचे विश्वासोनी ॥२॥ नेदी जाऊं कोठें दुरी । पुरवी अवघेंचि हा घरीं ॥३॥ निळा म्हणे त्वरित आला । फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥