ऐसा जोडियला दातार – संत निळोबाराय अभंग – ७६४
ऐसा जोडियला दातार ।
करुनी नामाचा उच्चार ॥१॥
आम्हीं भाग्यवंतीं जनीं ।
पायीं याचे विश्वासोनी ॥२॥
नेदी जाऊं कोठें दुरी ।
पुरवी अवघेंचि हा घरीं ॥३॥
निळा म्हणे त्वरित आला ।
फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥
ऐसा जोडियला दातार ।
करुनी नामाचा उच्चार ॥१॥
आम्हीं भाग्यवंतीं जनीं ।
पायीं याचे विश्वासोनी ॥२॥
नेदी जाऊं कोठें दुरी ।
पुरवी अवघेंचि हा घरीं ॥३॥
निळा म्हणे त्वरित आला ।
फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥