उतरिला माझा भार – संत निळोबाराय अभंग – ७६२
उतरिला माझा भार ।
येणें कैवार धरुनियां ॥१॥
आपुला आपण सोहळा करी ।
पाहिजे संसारीं पुरवी तें ॥२॥
नेदि पडों उणें कोठें ।
आलीं संकटें निवारी ॥३॥
निळा म्हणे झाला ऋणी ।
चक्रपाणी आम्हां घरीं ॥४॥
उतरिला माझा भार ।
येणें कैवार धरुनियां ॥१॥
आपुला आपण सोहळा करी ।
पाहिजे संसारीं पुरवी तें ॥२॥
नेदि पडों उणें कोठें ।
आलीं संकटें निवारी ॥३॥
निळा म्हणे झाला ऋणी ।
चक्रपाणी आम्हां घरीं ॥४॥