विसारे गोंविला । अवघा आंखुनी ठेविला ॥१॥ देउनिया अहंभावो । भक्तीं सांठविला देवो ॥२॥ नामाचिंतन । करुनि केला हा स्वाधीन ॥३॥ निळा म्हणे जिवेंसाठीं । करुनि सामाविला पोटीं ॥४॥