आळवूं आम्ही विठोबासी ।
नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥
राग कळा घात मात ।
स्वर संगीत मूर्छना ॥२॥
ताल ग्राम छंद बंद ।
गीत प्रबंध कंपित ॥३॥
निळा म्हणे प्रेमें वाणी ।
गर्जवूं गुणीं श्रीहरिच्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.