आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥ अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्त्रीं गुण त्याचे ॥२॥ जेणें उदंड सभाग्य केलें । निजदास आपुले भूमंडळी ॥३॥ निळा म्हणे उपेक्षूं नेणें । आपुलिया स्मरणें नामाच्या ॥४॥