आम्हां सुखा नाहींचि उणें – संत निळोबाराय अभंग – ७५६
आम्हां सुखा नाहींचि उणें ।
सेवागुणें स्वामीचियां ॥१॥
अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं ।
गाऊं वक्त्रीं गुण त्याचे ॥२॥
जेणें उदंड सभाग्य केलें ।
निजदास आपुले भूमंडळी ॥३॥
निळा म्हणे उपेक्षूं नेणें ।
आपुलिया स्मरणें नामाच्या ॥४॥