आम्हां सापडलें वर्म – संत निळोबाराय अभंग – ७५५

आम्हां सापडलें वर्म – संत निळोबाराय अभंग – ७५५


आम्हां सापडलें वर्म ।
हरिभक्तिचें सुगम ॥१॥
त्यांचे आळवावें नाम ।
ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥२॥
वाजउनी टाळी ।
सुखें नाचावें राउळीं ॥३॥
निळा म्हणे संतीं ।
दाविलें हें कृपावंतीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्हां सापडलें वर्म – संत निळोबाराय अभंग – ७५५