असो त्याची मात । गाऊं गीतीं पंढरीनाथ ॥१॥ जेणें मनासीं विश्रांती । फावे इंद्रियां सुखशांती ॥२॥ आळवितां नामें । भुवनें चौदाहिं संगमें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । करी कृपा राहे पासीं ॥४॥