असोतु ऐसियाच्या गोठीं । काय करुनि लाभ तुटी ॥१॥ गाऊं विठठलु सांवळा । आठवूं तो वेळोवेळां ॥२॥ जया चरणीं ब्रीद भार । वांकि किंकणी झणत्कार ॥३॥ निळा म्हणे तुळसीमाळा । पदक एकावळी गळां ॥४॥