असो आतां हें बोलणें । आम्ही निर्भय एक्या गुणें ॥१॥ सांगितलें करुं काम । हातें टाळी मुखें नाम ॥२॥ गुण वानूं नानापरी । आज्ञा त्याची वंदुनी शिरीं ॥३॥ निळा म्हणे राजा धरी । हातीं तया सभाग्य करीं ॥४॥