अवघ्या अंगें अवघें झालों । अवघेचि ल्यालों आळंकार ॥१॥ अवघ्या ठायीं अवघ्या देहीं । अवघ्या नाहीं वेगळां ॥२॥ अवघ्यां जवळी अवघ्यां दुरी । अवघ्यां परी सारखा ॥३॥ अवघा निळा अवघ्यां संगें । अवघ्या रंगे रंगला ॥४॥