अवघ्या अंगें अवघें – संत निळोबाराय अभंग – ७५१
अवघ्या अंगें अवघें झालों ।
अवघेचि ल्यालों आळंकार ॥१॥
अवघ्या ठायीं अवघ्या देहीं ।
अवघ्या नाहीं वेगळां ॥२॥
अवघ्यां जवळी अवघ्यां दुरी ।
अवघ्यां परी सारखा ॥३॥
अवघा निळा अवघ्यां संगें ।
अवघ्या रंगे रंगला ॥४॥