अवघाची गुणीं आहे हा भला । परि हा याला लोभ कां ॥१॥ कांहींच उरों नेदी माझें । संचिंतपुजें भरियेलें ॥२॥ बरें वाईट हा न म्हणेचि कांहीं । पाप पुण्य तेंहि लुंचियेलें ॥३॥ निळा म्हणे जें जें देखें । तें तें हा सुखें भरितुची ॥४॥