झाले ते ते चमत्कार ।
निरंतर आठवती ॥१॥
काय सांगो कोणापासी ।
अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥
ज्या ज्या काळें जें जें झालें ।
तुम्ही जें केलें कौतुक तें ॥३॥
निळा म्हणे धरुनी ध्यानीं ।
राहिलों तें मनिं आठवीत ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.