सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा ।
तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥
म्हणऊनियां आशे लागलों नेणता ।
बुडवूनि थितां संवसार ॥२॥
आतां माझी कोण करील बुझावण ।
तुम्ही उदासीन झाल्यावरी ॥३॥
कोणीये ब्रम्हांडीं रहिवास तुमचा ।
लाग माग त्याचा न पडे ठायीं ॥४॥
अंतरलों बहू दूरदूददेशीं ।
कोण सांगायासी येईल तेथें ॥५॥
निळा म्हणे माझें प्रारब्धचि खोटें ।
म्हणुनि वैकुंठें त्याग केला ॥६॥