माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥ तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥ काय नेणों वदवा वाणी । वळूनियां गुणीं आपुला ॥३॥ निळा म्हणे ल्याली लेणें । प्रसाद भूषणें तुमची ॥४॥