माझिये वाचेसी नाहीं – संत निळोबाराय अभंग – ७४५
माझिये वाचेसी नाहीं धीर ।
प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥
तुमचे कृपेचा हा महिमा ।
पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
काय नेणों वदवा वाणी ।
वळूनियां गुणीं आपुला ॥३॥
निळा म्हणे ल्याली लेणें ।
प्रसाद भूषणें तुमची ॥४॥
माझिये वाचेसी नाहीं धीर ।
प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥
तुमचे कृपेचा हा महिमा ।
पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
काय नेणों वदवा वाणी ।
वळूनियां गुणीं आपुला ॥३॥
निळा म्हणे ल्याली लेणें ।
प्रसाद भूषणें तुमची ॥४॥