शुध्द सत्त्व कैंचा गांठी । जेणें संवसाटीं तुम्हासी ॥१॥ म्हणोनि देवा वाटे भय । कैसेनि आपाय चुकती हे ॥२॥ यज्ञें स्वर्गे न चुके कदा । अध्ययनें संपदा सत्यलोक ॥३॥ निळा म्हणे रजतमें योनी । भोगा यतनी चौर्यांशी ॥४॥