संत ऐकती निवाडें – संत निळोबाराय अभंग – ७४३

संत ऐकती निवाडें – संत निळोबाराय अभंग – ७४३

संत ऐकती निवाडें ।
बैसोनि पुढें गुणतुमचे ॥१॥
तैसेचि गाऊं तयांपासीं ।
आर्त मानसीं धरुनियां ॥२॥
जया जेथें पडेल रुची ।
बोलों तैसेचि सारांश ॥३॥
निळा म्हणे अपार पेणें ।
वोळलें देणें तुमचें हरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत ऐकती निवाडें – संत निळोबाराय अभंग – ७४३