नाहीं लौकिकासी काम – संत निळोबाराय अभंग – ७४२
नाहीं लौकिकासी काम ।
गाईन नाम सर्वदा ॥१॥
हेंचि माझें भांडवल ।
विठ्ठल विठ्ठल खरें नाणे ॥२॥
नेघों भुक्ति नेघों मुक्ति ।
प्रेम विरक्ति हरिनामीं ॥३॥
निळा म्हणे साधन सार ।
तुमच्या उच्चार नामाचा ॥४
नाहीं लौकिकासी काम ।
गाईन नाम सर्वदा ॥१॥
हेंचि माझें भांडवल ।
विठ्ठल विठ्ठल खरें नाणे ॥२॥
नेघों भुक्ति नेघों मुक्ति ।
प्रेम विरक्ति हरिनामीं ॥३॥
निळा म्हणे साधन सार ।
तुमच्या उच्चार नामाचा ॥४