नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥१॥ माझीचि मज न दिसतीं । निजांगें दीप्ति प्रकाशें ॥२॥ मी माझें हें नाढळेंचि कांहीं । देहादेही विसर ॥३॥ निळा म्हणे एकींएक । भोंदितां लेख पूर्णत्वें ॥४॥