नामें तुमचीं गाऊं मुखें – संत निळोबाराय अभंग – ७३८

नामें तुमचीं गाऊं मुखें – संत निळोबाराय अभंग – ७३८

नामें तुमचीं गाऊं मुखें ।
राहों सुखे चितंनीं ॥१॥
आणखी नेघों दयाल तरी ।
पढों वैखरीं गुण तुमचे ॥२॥
ठाको उभा संतमेळीं ।
करुं धुमाळी हरिकथा ॥३॥
निळा म्हणे नित्य नवी ।
सेवा घ्यावी कृपाळुवा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामें तुमचीं गाऊं मुखें – संत निळोबाराय अभंग – ७३८