नामें तुमची गाउनि छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥ धरुनियां दृष्टी पुढें । पाहीन रुपडें सुरेख ॥२॥ वारंवार क्षणक्षणां । ठेवीन चरणांवरीं माथा ॥३॥ निळा म्हणे पुरवा कोड । तुम्हीचि चाड जाणोनीं ॥४॥