नामें तुमची गाउनि छंदें – संत निळोबाराय अभंग – ७३७
नामें तुमची गाउनि छंदें ।
ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥
धरुनियां दृष्टी पुढें ।
पाहीन रुपडें सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणां ।
ठेवीन चरणांवरीं माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
तुम्हीचि चाड जाणोनीं ॥४॥
नामें तुमची गाउनि छंदें ।
ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥
धरुनियां दृष्टी पुढें ।
पाहीन रुपडें सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणां ।
ठेवीन चरणांवरीं माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
तुम्हीचि चाड जाणोनीं ॥४॥