ठेउनी चित्त पायांवरीं । करीन चाकरी मनोभावें ॥१॥ भोगवाल ते भोगीन भोग । न वंची अंग तिळतुल्य ॥२॥ आज्ञा तुमची वंदीन शिरीं । धरीन अंतरीं सांगितलें ॥३॥ निळा म्हणे अखंड निरत । राहेन सतत सेवेचिये ॥४॥