नेणों कांहीं तुम्ही आपुलियां सुखें । इतरांचि दु:खें पिडिति तें ॥१॥ यातना बहुवस संसारकाचणी । जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥ व्याधिचे वळसे दरिद्राचि पीडा । मृत्यूची देव्हडा होता मार ॥३॥ निळा म्हणे सांपडली काळाहाती । नुगवति गुंती उगवितां ॥४॥