न घालीं मी सांकडें – संत निळोबाराय अभंग – ७३०

न घालीं मी सांकडें – संत निळोबाराय अभंग – ७३०

न घालीं मी सांकडें ।
तुम्हां संसाराचें कोडें ॥१॥
नामें गाईन आवडीं ।
पुढें नाचोनी बागडी ॥२॥
ध्यांईन मानसीं ।
रुप तुमचें अहर्निशीं ॥३॥
निळा म्हणे यावरि करा ।
कृपा रुक्‍मादेवीवरा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न घालीं मी सांकडें – संत निळोबाराय अभंग – ७३०