संत निळोबाराय अभंग

ध्यानीं रंगले मानस – संत निळोबाराय अभंग – ७२९

ध्यानीं रंगले मानस – संत निळोबाराय अभंग – ७२९


ध्यानीं रंगले मानस ।
जिव्हें नावांचा उल्हास ।
कीर्तन आवडे श्रवणांस ।
नेत्रही स्वरुपास भाळलें ॥१॥
वाचा लांचावली गुणा ।
तुमच्या नामसंकीर्तना ।
देह घाली लोटांगणा ।
मस्तक चरणां सोकावला ॥२॥
ऐसीं अवघीच अवघ्या ठायीं ।
पडलीं तुमचिये प्रवाहीं ।
तुम्हावीण दुजें कांही ।
कोणा नाठवे सर्वथा ॥३॥
देखिलें तें विटेवरी ।
राहिलें डोळियांभीतरीं ।
तें अवघिया एकचि सरी ।
वेधूनियां ठेविलें ॥४॥
निळा म्हणे नव्हे आतां ।
पालट केलियाही सर्वथा ।
नामें रुपें पंढरीनाथा ।
लाविले पंथा आपुलिया ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ध्यानीं रंगले मानस – संत निळोबाराय अभंग – ७२९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *