धाडाल तेथें जाईन – संत निळोबाराय अभंग – ७२८

धाडाल तेथें जाईन – संत निळोबाराय अभंग – ७२८

धाडाल तेथें जाईन देवा ।
सांगाल सेवा तेचि करीन ॥१॥
लेवलाव तें लेईन लेणें ।
मिरवीन भूषणें कराल तें ॥२॥
सांगाल तेंचि ऐकेन गोष्टी ।
धरुनियां पोटीं राहेन अर्थ ॥३॥
निळा म्हणे येईन मागे ।
तुम्ही न्याल संगें त्याचि स्थळां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धाडाल तेथें जाईन – संत निळोबाराय अभंग – ७२८