सूर्य विटला प्रकाशासी – संत निळोबाराय अभंग – ३९३

सूर्य विटला प्रकाशासी – संत निळोबाराय अभंग – ३९३

सूर्य विटला प्रकाशासी ।
परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥
तेवीं हा पंढरीश परमात्मा ।
सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥
अग्नि दीपना विटला ।
परि ते न सुटेचि कीं त्याला ॥३॥
निळा म्हणे साखरे गोडी ।
उदका आर्द्रता न सोडी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सूर्य विटला प्रकाशासी – संत निळोबाराय अभंग – ३९३