आतां तरी विचार करी – संत निळोबाराय अभंग – ९९९
आतां तरी विचार करी ।
ध्यायीं अंतरीं विठठला ॥१॥
नाहीं तरी व्यर्थचि जासी ।
पुढें चौर्यांयसीं भोगावया ॥२॥
जिणें मरणें यांहुनी दु:ख ।
कोणतें अधिक् सांग पा ॥३॥
निळा म्हणे जरा व्याधी ।
नाना उपाधी दरिद्रें ॥४॥