आणिकाची संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ९९७

आणिकाची संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ९९७

आणिकाची संपत्ती ।
देखोनि दु:ख मानी चित्तीं ॥१॥
ऐसा पातकी चांडाळ ।
अशुचि तो सर्वकाळ ॥२॥
करी सज्जनांची निंदा ।
आपण दरिद्री सर्वदा ॥३॥
निळा म्हणे सहज गांठीं ।
बांधे यातनेच्या कोटी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिकाची संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ९९७