आजिवरी काळ वृथाचि गेला । जेथुनियां झाला सृष्टिक्रम ॥१॥ ऐसेचि नाना धरितां वेष । न तुटती पाश कर्माचे ॥२॥ केव्हां स्वर्ग केव्हां नर्क। केव्हां दु:खदायक संसार ॥३॥ निळा म्हणे न पुरे घडी । ओढाओढी कल्प जातां ॥४॥